भाजपने कर्नाटकात पाळला काळा दिन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/bjp-01.jpg)
बंगळूर – कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार अस्तित्वात आल्याच्या दिवशी आज भाजपने कर्नाटकात काळा दिवस पाळला. आघाडी सरकारच्या विरोधात भाजपने येथे निदर्शने केली. कॉंग्रेस आणि जेडीएसची हातमिळवणी म्हणजे संधिसाधू आघाडी असल्याचे टीकास्त्र यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी सोडले.
नव्या आघाडीत दुर्लक्षित केले गेल्याची भावना बनलेल्या कॉंग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे खुले निमंत्रणही त्यांनी दिले. दरम्यान, काळा दिवस पाळल्याबद्दल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपवर पलटवार केला. जनतेबद्दल कुठलीही चिंता नसणे हीच भाजपची कार्यपद्धती आहे. काळा दिवस पाळणे, यात्रा काढणे अशा माध्यमातून जनतेची दिशाभूर करण्याभोवती फक्त भाजपचे राजकारण फिरते. त्या पक्षाकडून कुठल्या चांगल्या कृतीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे कुमारस्वामी यांनी म्हटले.