breaking-newsआंतरराष्टीय

ब्रिटिश न्यायालयाचा विजय मल्ल्याला दणका

भारतीय बॅंकांना 1 कोटी 31 लाख रुपयांची भरपाई देण्याचे दिले आदेश

लंडन – भारतीय बॅंकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात फरार असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्याला शुक्रवारी ब्रिटिश न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने विजय मल्ल्याला भारताच्या 13 बॅंकांना 2 लाख पाऊंड्‌सची (1 कोटी 80 लाख रुपये) भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

लंडनमधील न्यायालयाच्या न्या. अँड्रयू हेन्शॉ यांनी गेल्या महिन्यात आयडीबीआयसह अन्य भारतीय बॅंकांना भारतीय न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यास पूर्ण मुभा दिली होती. तब्बल दीड अब्ज डॉलरच्या वसुलीसाठी भारतीय बॅंकांनी हा खटला दाखल केला होता. आपल्या जगभरातील मालमत्ता जप्त करण्याचा आदेश रद्दबातल ठरवावा, ही मल्ल्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विजय मल्ल्याला भारतीय बॅंकांना 2 लाख पाऊंड्‌सची भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच भारतीय बॅंकां विजय मल्ल्याकडून 1.145 अब्ज पाऊंड्‌सची वसूल करण्याचे हक्कदार असल्याचेही स्पष्ट केले.

उद्योगपती विजय मल्ल्या मार्च 2016मध्ये लंडनमध्ये पळून गेला आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशात आता बॅंकांनी केलेले दावे वैध ठरवल्याने विजय मल्ल्याच्या अडचणीत भर पडली आहे. तसेच विजय मल्ल्याच्या प्रत्यापनासाठी अन्य एका खटल्याची सुनावणी सुरू असून त्यावर पुढील महिन्यात अंतिम सुनावणी होणार आहे.
दरम्यान, विजय मल्ल्या याने भारतीय बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. यात भारतीय स्टेट बैंक, कारपोरेशन बॅंक, फेडरल बॅंक, आईडीबीआई, बॅंक आफ बडोदा, इंडियन ओवरसीज बॅंक, जम्मू कश्‍मीर बॅंक, पंजाब ऍण्ड सिंध बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, स्टेट बॅंक आफ म्हैसूर, यूको बॅंक, यूनाइटेड बॅंक आफ इंडिया आदी बॅंकांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button