breaking-newsराष्ट्रिय

बोस यांच्या रशियातील वास्तव्याची कागदपत्रे नाहीत

नवी दिल्ली : भारताने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वास्तव्याची माहिती मिळण्यासाठी रशियाला अनेकदा विनंत्या केल्या असून तेथील अभिलेखागारात कुठलीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्यांनी कळवले आहे, अशी माहिती लोकसभेत बुधवारी देण्यात आली.

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे की, भारताने नेताजी सुभाषचंद्र बोस हे ऑगस्ट १९४५  पूर्वी किंवा नतर रशियात होते की, नाही याबाबत रशियाकडे माहिती मागितली होती. बोस यांच्या वास्तव्याची माहिती रशियाकडे असण्याची शक्यता गृहित धरून २०१४ पासून अनेकदा विनंत्या करण्यात आल्या, त्यानुसार शोध घेतला असता त्यांना रशियातील अभिलेखागारात कुठलीही कागदपत्रे सापडेलेली नाहीत.

सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये केली व जपानी लष्कराच्या पाठिंब्याने त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. नेताजींचा मृत्यू तैवान येथील अपघातात १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button