बोधगया स्फोटातील आरोपींना जन्मठेप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/court-hamme.jpg)
पाटणा – बोधगया येथे सन 2013 साली करण्यात आलेल्या बॉंबस्फोट प्रकरणातील दोषी पाच दहशतवाद्यांना आज एनआयए कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे पाचही दहशतवादी इंडियन मुजाहिदीन संघटनेशी संबंधीत आहेत. इम्प्तीयाज अन्सारी, हैदर अली, मुजीब उल्लाह, ओमर सिद्दीकी आणि अझहरूद्दीन कुरेशी अशी त्यांची नावे आहेत. गेल्या 25 मे रोजीच त्यांना या प्रकरणात दोषी घोषित करण्यात आले होते. त्यांची शिक्षा आज सुनावण्यात आली.
बोधगयात बौद्ध धार्मिक स्थळा नजीक झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले होते. 7 जुलै 2013 रोजी हे स्फोट झाले होते. या प्रकरणात तौफिक अहमद नावाच्या अल्पवयीन मुलालाही दोषी ठरवण्यात आले असून त्याची रवानगी तीन वर्षांसाठी रिमांड होम मध्ये करण्यात आली आहे. या सहाही जणांवर सन 2013 साली पाटण्यातही स्फोट केल्याचा आरोप आहे. त्यावेळी पाटण्यात मोदींच्या रॅलीच्यावेळी झालेल्या स्फोटात एकूण सहा जण ठार झाले होते तर अन्य अनेक जण जखमी झाले होते.