breaking-newsआंतरराष्टीय

बेरुत स्फोटातील मृतांचा आकडा १३५ वर पोहचला

बेरुत – लेबनॉनची राजधानी बेरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असून या स्फोटांच्या चित्रफितींतूनही तसेच दिसून येत आहे. दरम्यान, या स्फोटातील मृतांचा आकडा वाढला असून तो १३५ वर पोहचला आहे. तर यात चार हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या स्फोटांनंतर सरकारने दोन आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे. तसेच यादरम्यान लष्करालाही अनेक अधिकार देण्यात आले आहेत.

काल बुधवारी लेबनॉन सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर आणीबाणीची घोषणा करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तपास होईपर्यंत बेरुत बंदराच्या अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

मंगळवारी रात्री झालेल्या या स्फोटांनंतर बेरुतच्या रहिवाशांना बुधवारी सकाळी या भीषण विध्वंसाची दृश्ये नजरेला पडली. नागरी युद्ध, इस्रायलसोबतचे संघर्ष आणि दहशतवादी हल्ले सोसणाऱ्या या शहरातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्फोट होता. शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर दगडमाती आणि उद्ध्वस्त झालेली वाहने विखुरली होती, तसेच इमारतींचे दर्शनी भाग भग्न झाले होते. बेपत्ता किंवा जखमी झालेल्या आपल्या प्रियजनांबाबत कळावे म्हणून लोक रात्रभर शहरभरातील रुग्णालयांमध्ये ताटकळत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button