breaking-newsराष्ट्रिय
बुखारी हत्या प्रकरणातील संशयितास अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/arrest-LOCKER-1.jpg)
श्रीनगर – जम्मू काश्मीरातील ज्येष्ठ पत्रकार शुजान बुखारी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी एका संशयितास काल सायंकाळी अटक केली आहे. झुबेर कादरी असे या संशयिताचे नाव आहे. बुखारी यांच्या बरोबरच त्यांच्या दोन अंगरक्षकांचीही हत्या झाली आहे.
या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले असून त्यावरून तपास केल्यानंतर झुबेर पोलिसांच्या हाती लागला आहे. हत्येवेळी ठार झालेल्या सुरक्षा जवानाचे पिस्तुल हिसकाऊन घेताना जो मारेकरी सीसीटीव्ही फुटेज मधून दिसतो आहे, तो झुबेर कादरी आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने चौकशीला अद्याप दाद दिली नाही पण तो लवकरच बोलेल असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्य मारेकऱ्यांचाही कसून शोध जारी असून त्यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत आहेत.