breaking-newsआंतरराष्टीय

‘बिग बँग थेअरी’चे जनक जॉर्ज लेमैत्रे यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – कॅथलिक पुजारी, खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक जॉर्ज लेमैत्रे यांची आज १२४ वी जयंती आहे. यानिमित्त गुगलने एक खास डूडल साकारत त्यांना आदरांजली दिली आहे. या डूडलमध्ये लेमैत्रे यांचे छायचित्र असून त्यामागे विस्तारणारे ब्रम्हांड दिसत आहे. बिग बँग थेअरीचे ते जनक आहेत.

जॉर्ज लेमैत्रे यांचा जन्म १७ जुलै १८९४ रोजी बेल्जियममध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षीच सिव्हील इंजिनीअरिंगचे शिक्षण सुरु केले होते. मात्र, काही कारणाने त्यांचे शिक्षण थांबले. परंतु, १९२३ मध्ये लेमैत्रे यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून पदवी घेतली. त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता. १९२७ साली लेमैत्रे यांनी लियुवेनच्या कॅथलिक विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून काम केले. त्याच वर्षी लेमैत्रे यांनी विश्वाच्या उत्पतीची ‘बिग बँग थेअरी’ जगासमोर मांडली. लेमैत्रे यांच्या सिंद्धातानुसार ब्रम्हांड सातत्याने विस्तारत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button