बाप-लेकांनी लग्नासाठी २२ वर्षीय मुलीचं केलं अपहरण
लग्नासाठी शेजारच्या २२ वर्षीय मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार उत्तरप्रदेशमधील सहरानपूरमध्ये घडला आहे. हा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. दोन मुलांनी त्यांच्या वडिलांच्या साथीनं माझ्या मुलीचं अपहरण केलं. गेल्या दहा दिवसांपासून मुलगी त्यांच्याकडे बंधक होती. मुलीचे वडिल प्रदिप यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, टोनी (२२ वर्ष), विजेंद्र (२१ वर्ष) आणि त्यांचे वडिल चंद्रभान (४० वर्ष) सर्व राहणारे सहरानपूरमधील सदर बाजारमध्ये राहतात. या प्रकरणामध्ये आणखी एकाचा समावेश आहे. हा सर्व प्रकार तीन जून रोजी घडला आहे. तीन तारखेला मुलगी ऑफिससाठी घरांतून निघाली आणि माघारी परतलीच नव्हती. त्यावेळी वडिलांनी शोध घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
प्रदिप कुमार म्हणाले की, घराशेजारी असलेल्या एका व्यक्तीनं टोनीच्या घरी माझ्या मुलीला पाहिले. त्यानंतर आम्हाला मुलीबाबत समजले. माझ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी टोनी सतत प्रयत्न करत होता. त्यामधून त्यानं अपहरण केलं आहे. टोनी आणि विजेंद्र यांच्या घरी मुलगी असल्याचे मला काही नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांना घेऊन त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी फक्त टोनीची आई आणि माझी मुलगी घरी होती. पोलिसांनी मुलीची सुटका केली.
टोनी (२२ वर्ष), विजेंद्र (२१ वर्ष) आणि त्यांचे वडिल चंद्रभान (४० वर्ष) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भा.द.वि कलम ३६६, ३४२, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.