breaking-newsराष्ट्रिय

बनावट संदेश ओळखण्यासाठी व्हॉट्‌स ऍपकडून टिप्स

सत्यता पडताळण्याचे ग्राहकांना आवाहन

नवी दिल्ली – अफवा आणि प्रक्षोभक संदेश, व्हिडीओ व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून पसरवल्या जात असल्याच्या पार्श्‍वभुमीवर अशा बनावट संदेशांना ओळखण्यासाठी व्हॉट्‌स ऍपने आजपासून जनजागृती अभियानास सुरुवात केली आहे. असे बनावट संदेश, व्हिडीओ आणि फसव्या बातम्या ओळखायच्या कशा आणि अफवा पसरण्यास अटकाव कसा करायचा, याच्या टिप्स व्हॉट्‌स ऍपकडून ग्राहकाना दिल्या जायला लागल्या आहेत.

मुले पळवणाऱ्या टोळीबाबतचा व्हिडीओमुळे देशाच्या काही भागांमध्ये अफवांचे लोण पसरायला लागल्याने व्हॉट्‌स ऍपने या टिप्स ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गेल्या आठवड्यात व्हॉट्‌स ऍपला अधिक जबाबदार राहण्याची सूचना केली होती. अफवा पसरवणे, हिंसा भडकावणे आणि चिथावणी देण्यासाठी या समाज माध्यमांचा दुरुपयोग होणे सरकार खपवून घेणार नाही, असे प्रसाद म्हणाले होते.

सरकार, नागरी सामाजिक गट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांनी एकत्रित काम केल्यास बनावट बातम्या, चुकीची माहिती आणि अफवा यांच्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल, असे व्हॉट्‌स ऍपने सरकारला सांगितले होते. ही चुकीची माहिती तपासण्यासाठी एक नवीन “फिचर’ या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. त्याच्या आधारे संदेशांची सत्यता पडताळून पाहणे ग्राहकांना शक्‍य होणार आहे.

आलेला संदेश शंकास्पद, प्रक्षुब्ध, विचलित किंवा भीती निर्माण करणारा आहे का ? असा प्रश्‍न ग्राहकांनीच उपस्थित करावेत. बनावट बातम्या ओळखण्यासाठी “स्पेलिंग’ तपासून पहावे. आपल्याला स्रोताबाबत पूर्ण खात्री नसेल तर असे मेसेज शेअर करूच नयेत. लिंक केलेल्या वेबसाईटचा आयडी नावाजलेल्या वेबसाईटसारखा असू शकतो. पण तसे असेलच असे नाही. यासाठी आयडीचे स्पेलिंगही तपासून सत्यता पडताळावी, अशी सूचना व्हॉट्‌स ऍपने ग्राहकांना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button