बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी; ३० मे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/383485-667516-bankofinda.jpg)
मुंबई : बँकेमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियात सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. कार्यालय सहाय्यक अर्थात ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी सदस्य आणि अटेंडेंट या पदांसाठी इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. योग्य उमेदवार या पदांसाठी 31 मे 2020 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करु शकतात. इच्छुकांनी अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रं जोडणं आवश्यक असणार आहे.
कार्यालय सहाय्यक अर्थात ऑफिस असिस्टंट –
पदं – 2
वेतन – 15 हजार प्रति माह
शिक्षण – कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त
वयोमर्यादा – 18 ते 45
अनुभव – फ्रेशर
फॅकल्टी सदस्य –
पदं – 3
वेतन – 20 हजार प्रति माह
शिक्षण – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा डिप्लोपा
वयोमर्यादा – 25 ते 65
अनुभव – 2 ते 5 वर्ष
अटेंडंट –
पद – 1
वेतन – 8 हजार प्रति महा
वयोमर्यादा – 18 ते 65
अनुभव – फ्रेशर