प्रेयसीसाठी प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न, प्रियकर अटकेत
![Military recruitment exam paper torn, police took 'this' action](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/exam-paper.jpg)
उत्तर प्रदेशातील एका प्रमुख राजकीय पक्षाचा पदाधिकारी असणारा फिरोज आलम ए.के. उर्फ राजा हा तरूण सोमवारी प्रेयसीसाठी एमबीएची प्रश्नपत्रिका फोडायला गेला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
केवळ प्रेयसीला मदत करण्यासाठीच मी प्रश्नपत्रिका फोडीचा प्रयत्न केल्याचे त्याने कबूल केले आहे. त्याने प्रेयसीला परीक्षेअगोदरच प्रश्नपत्रिका मिळवून देईल असे वचन दिले होते. अलिगढ विद्यापीठातील कर्मचारी इर्शाद याच्या सोबतीने त्याने हा कट रचला होता. या कामात राजाला त्याचा मित्र हैदर देखील मदत करत होता, त्यामुळे आता इर्शाद व हैदराला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. तर त्याची प्रेयसी फरार झाली आहे.
मित्रांच्या सांगण्यावरून प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी राजा हे सर्व करीत होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हैदर ज्या फ्लॅटवर राहात होता. त्याला सील केले आहे. याठिकाणीच या तिघांच्या बैठका झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश यांनी दिली आहे.