breaking-newsराष्ट्रिय

पोलीस कर्मचाऱ्याने गोळी घातलेल्या न्यायाधीशाच्या मुलाने दिलं तिघांना जीवनदान

अतिरिक्त सत्र न्यायाधीश कृष्णन कांत यांचा मुलगा ध्रुव याचा मंगळवारी सकाळी चार वाजता मेदांता रुग्णालयात मृत्यू झाला. अवयवदानासाठी न्यायाधीश कृष्णन कांत यांनी तयारी दर्शवल्यानंतर ध्रुवच्या दोन्ही किडनी आणि यकृत सर्जरी करुन काढण्यात आलं. ध्रुवमुळे तिघांना जीवनदान मिळालं आहे.

दुपारी 12 वाजता शवविच्छेदनासाठी ध्रुवचा मृतदेह नेण्यात आला. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टर दीपक माथूर आणि पवन चौधरी यांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, दोन गोळ्या डोक्यातून आरपार गेल्या होत्या, तर तिसरी गोळी मानेवर लागली होती. यामुळेच ध्रुव ब्रेन डेड झाला होता. न्यायाधीश कृष्णन कांत यांच्या पत्नी आणि मुलावर सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी माहिपाल सिंह याने गोळी झाडली होती. हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 38 वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला होता. तर मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.

मेदांता रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ध्रुवच्या दोन किडनी आणि एका यकृतामुळे तिघांना जीवनदान मिळालं आहे’. रुग्णालयच्या नियमानुसार, हे अवयव कोणाला दान करण्यात आले आहेत याची माहिती मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दिली जात नाही.

पोलीस कर्मचाऱ्याने गोळी घातलेल्या न्यायाधीशाच्या मुलाचा मृत्यू, अवयवदान करण्याचा निर्णय

अतिरिक्त सत्र न्यायाधीश कृष्णन कांत यांच्या पत्नी आणि मुलावर आरोपी माहिपाल सिंह याने 13 ऑक्टोबरला गोळीबार केला होता. आई आणि मुलगा सेक्टर ४९ मध्ये औषधांच्या खरेदीसाठी गेलेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 38 वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला होता. तर मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.

धक्कादायक! सुरक्षारक्षकानेच न्यायाधीशाची पत्नी आणि मुलावर केला गोळीबार

घटनेनंतर काही वेळातच आरोपी माहिपालला अटक कऱण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली. गेल्या चार वर्षांत त्याने अनेक अधिकाऱ्यांकडे वैयक्तित सुरक्षारक्ष म्हणून तो तैनात होता. न्यायाधीशांसाठी गेल्या दोन वर्षांपासून तो काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात आरोपी माहिपालने हे कृत्य केलं होतं. न्यायाधीशांची पत्नी रितू आणि मुलगा ध्रुव यांना खरेदी झाल्यानंतर माहिपाल सापडत नसल्याने खूप सुनावलं होतं. यावरुनच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने दोघांवर गोळीबार केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button