breaking-newsटेक -तंत्र

पेन ड्राईव्ह खराब झाल्यावर ठीक करता येतो का?

पेन ड्राईव्ह डेटा साठवण्याचे किंवा वाहण्याचे सर्वात चांगले माध्यम आहेत. आजकाल यूएसबी ड्राईव्ह 128 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त स्टोरेज पर्यायसह उपलब्ध आहेत. पेन ड्राईव्हमध्ये आपण बराच डेटा स्टोर करू शकता. हार्ड-डिस्कच्या तुलनेत हे किफायतशीर आहेत. अनेकजण पेन ड्राईव्ह खराब झाल्यावर तो टाकून देतात. मात्र तुम्हाला माहित आहे का, खराब झालेला पेन ड्राईव्ह दुरुस्त करता येतो. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहोत. खालील प्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने आपण खराब झालेला पेन ड्राईव्ह दुरुस्त करू शकतात.

ड्राइव्हचे लेटर (C, D, E) बदलणे:

कधीतरी आपला कंप्युटर हा जोडल्या गेलेल्या पेनड्राईव्हला ड्राइव्हचे नाव देण्यास असमर्थ असतो (किंवा होतो) उदाहरणार्थ C, D, E वगैरे. ह्या कारणामुळे आपण आपल्या पेनड्राइव्ह वरील फाईल किंवा माहिती बघू शकत नाही. अश्या वेळी आपण स्वतः त्या पेनड्राइव्हचे ड्राइव्ह लोकेशन करू शकता खालील प्रमाणे.

आपण ही पद्धत खालीलप्रमाणे वापरू शकतात.

आपला पेनड्राइव्ह आपल्या कंप्युटरला जोडा.
माय कंप्युटरवर राईट क्लिक करून मॅनेज ला क्लिक करा.
डाव्याबाजूवरील डिस्क मॅनेजमेंटला क्लिक करा.
आपल्याला दिसत असलेल्या स्टोरेज मेडियाला राईट क्लिक करून (Change Drive Letter and Paths) ला क्लिक करा.
Drive letter ला क्लिक करा (ते ब्लु रंगात बदल होईल) आणि चेंज ला क्लिक करा.
drive letter ला drop-down list मधून सिलेक्त करून ओके वर क्लिक करा.

दुसरा USB पोर्ट वापरून पहा:

बऱ्याचवेळा सारख्या वापरामुळे USB पोर्ट खराब होत असतात त्यामुळे दुसरा USB पोर्ट वापरून पाहायला हरकत नाही.

दुसरा कंप्युटरवर वापरून पहा:

बऱ्याचवेळा आपल्या कंप्युटर वर असे प्रकार होतात त्याकरिता दुसऱ्या कंप्युटर वर पेनड्राईव्ह लावून वापरून बघावे.

पेनड्राइव्हचे ड्राइवर पुन्हा इन्स्टॉल करून पहा:

बऱ्याचवेळा आपल्या कंप्युटरमधील ड्राइव्हर खराब (करप्ट) झालेले असतात आणि त्यामुळेसुद्धा ते पेनड्राइव्हला कनेक्ट होत नाही. यामुळे आपण पुन्हा एकदा ड्राइवर इन्स्टोल करून पाहणे.

फॉर्मेट न करता पेनड्राईव्ह दुरुस्त करून पाहणे:

विंडोस 10 मध्ये चेक डिस्क टूल नावाची एप्लिकेशन आहे. ते आपण खालीलप्रमाणे वापरू शकतात.

पेनड्राइव्ह कंप्युटर ला जोडा.
ड्राइव्ह लेटर लिहून घ्या.
एडमिन मोड मध्ये CMD प्रॉम्प्ट उघडा.
त्यामध्ये खालीलप्रमाणे कमांड टाईप करा.
chkdsk E: /f (Here, “E” is the drive letter)
एंटर बटण दाबा.
चेक डिस्क टूल आपल्या पेनड्राईव्ह ला स्कॅन करून प्रॉब्लेम फिक्स करू शकते.

पेनड्राईव्ह फॉर्मेट करून:

विंडोस 10 मध्ये पेनड्राईव्ह लावून झाल्यावर राईट क्लिक करून फॉर्मेट करून बघा

याव्यतिरिक्त आपण खालील दुवा अनुसरून टूल इन्स्टोल करून पेनड्राइव्ह रिकव्हरी करू शकतात.

10 Best Free Data Recovery Software [2020 Edition]

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button