breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ

नवी दिल्ली – पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढ केली आहे. सलग पाचव्या दिवशी देशात पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. पेट्रोल दरवाढ सुरू असली तरी दुसरीकडे कंपन्यांनी डिझेलच्या दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही.

गुरुवारपासून आजपर्यंत पाच दिवसांत पेट्रोल प्रति लिटर 1.19 रुपयांनी महागले आहे. या दरवाढीने मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 88.28 रुपये झाला असून डिझेलचा भाव प्रति लिटर 80.11 रुपयांवर कायम होता. दिल्लीत पेट्रोल आज 13 पैशांनी महागले असून पेट्रोलचे दर प्रति लिटर 81.35 रुपये झाले असून डिझेलचा भाव 73.56 रुपयांवर कायम होता. तर चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर 84.64 रुपये असून डिझेल प्रति लिटर 79.86 रुपये आहे. तसेच कोलकात्यात पेट्रोल प्रति लिटर 83.13 रुपये आणि डिझेल 77.06 रुपये प्रति लिटर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button