Breaking-newsराष्ट्रिय
पॅनकार्ड – आधार कार्ड जोडणीची मुदत वाढली
महाईन्यूज |
सरकारद्वारे पॅनकार्ड – आधार कार्ड जोडणीसाठी देण्यात आलेली अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे. या अगोदर पॅनकार्ड – आधार कार्ड जोडणीसाठी ३० सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती. तर, आता नवी अंतिम मुदत ३१ डिसेंबर देण्यात आली आहे.
त्यामुळे आता नागरिकांना पॅनकार्ड – आधार कार्ड जोडणी करून घेण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. केंद्र सरकारने आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले आहे. जे कोणी असे करणार नाही त्यांचे पॅनकार्ड अवैध मानले जाणार आहे.