breaking-newsराष्ट्रिय

पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज जम्मू-काश्मीरमधील विशेष कोर्टात 13,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात एनआयएने 13 जणांना आरोपी दाखवले आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचाही समावेश आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. जैशच्या एका दहशतवाद्याने आईईडी स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकवली होती. या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. आज एनआयएने या हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या विशेष कोर्टात 13,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button