पुरामुळे व्हिएतनाममध्ये 20 जणांचा मृत्यु
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/death-vietnam-6.jpg)
हनोई – येथील समुद्रामध्ये आलेल्या एका उष्णकटिबंधिय वादळामुळे अलेल्या पुरात 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला असून एक डझनहुन अधिक लोक बेपत्ता झाले असल्याची माहिती स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिली आहे. दरम्यान दरवर्षी अश्या प्रकारच्या वादळांमुळे व्हिएतनाम मध्ये शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात.
गेल्या अठवड्यात व्हिएतनामच्या उत्तरभागातील येन बाई प्रांतात असलेल्या सॉन तिन्ह या उष्णकटिबंधीय वादळामुळे 10 जणांचा बुडून मृत्यु झाला होता. तर लॅंग चान्ह प्रांतातील एका खेड्यात आलेल्या पूराच्या पाण्यामुळे गावातील अनेक घरे पूरात वाहुन गेल्याची माहिती यावेळी देण्याता आली आहे.
स्थानिक निवासी लुओंग व्हॅन हंग यांनी सांगितले की, पुराच्या पाण्याचा वेग इतका होता की, आम्हाला पळुन जाण्यास पुरेसा वेळच मिलाला नाही, त्यामुळे काही जण पूरामध्येच वाहुन गेले.
तर, लॅंग चहान जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुयेन जुआन हॉंग यांनी सांगीतले की, या पूरामध्ये एक चार सदस्यीय कुटूंब आपल्या घरात झोपलेले असताना घरासोबतच वाहुन गेले आहे. त्यातील दोन जणांची पकृती गंभीर असून त्या कुटूंबातील 5 वर्षीय मुलिचा मृतदेह त्यांच्या घरापासून 3 किलो मिटर अंतरावर सापडला आहे. तर 300 जणांचा बचावगट त्या कुटूंबातील चौथ्या सदस्याचा शोध घेत आहे.
त्याच बरोबर फू थो, लाओ काई, होआ बिन्ह व सोन ला प्रांतांमध्येही पुरा मुळे हाहाकार माजला असून तेथिल रस्ते वाहुन गेल्या मुळे गावांसोबतचा संपर्क तुटला आहे. रविवारी पाऊस पुर्णपणे थांबलेला असून बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सूरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली असून स्थानिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा नुसार आगामी काही दिवसांमध्ये अश्याप्रकारच्या आणखीन एक वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे.