Breaking-newsआंतरराष्ट्रीय
पुतीन-मोदी यांच्यात होणार अनौपचारिक चर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/VladimirPutin.jpg)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱयानंतर आता रशियाला जाणार आहेत. 21 मे रोजी मोदी मॉस्को येथे असतील. रशियातील दक्षिणेचे शहर सोचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान अनौपचारिक बैठक होणार आहे.
दोन्ही नेते व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय मुद्यांवर स्वतःचे विचार मांडतील. दोन्ही नेते राष्ट्रीय विकास प्राथमिकता आणि द्विपक्षीय मुद्यांवर देखील चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा दौरा बदलत्या जागतिक समीकरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा मानला जातोय. इराणवर अमेरिकेच्या नव्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या या दौऱयाचे महत्त्व वाढले आहे.