Breaking-newsराष्ट्रिय
पावसामुळे अमरनाथ यात्रेला उशीरा सुरवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/amarnath-pti_6.jpg)
- पावसामुळे अमरनाथ यात्रेमधे अडथळा
श्रीनगर : हिंदुंचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासुन सुरवात झाली आहे. यात्रेकरुंची पहिली तुकडी जम्मुतील भगवतीनगर बेस कॅम्प मधुन निघाली आहे. परंतु पावसामुळे बालताल किंवा पहलगाम बेस कॅम्प जवळ हे यात्रेकरु थांबले आहेत. पाऊस कमी झाल्यानंतर ही यात्रा पुन्हा सुरु होइल, अशी माहिती अमरनाथ यात्रा मंडळच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
या तुकडीत एकुण 1904 भाविकांचा समावेश आहे. यामध्ये 1554 पुरुष, 320 महिला 30 मुलांचा समावेश आहे.या यात्रेच्या मार्गादरम्यान कडटक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना लष्कराची सुरक्षा अमरनाथ गुहेपर्यंत असणार आहे.