पार्टीतला एकटीचाच फोटो फेसबुकवर शेअर केल्याने पतीची पोलीस ठाण्यात तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/facebook-.jpg)
स्मार्टफोन वापरामुळे अनेक गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत. घरबसल्या तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकता किंवा जगातील कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधू शकता. मात्र स्मार्टफोनमुळे अचडणीही तेवढ्याच वाढल्या आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक नात्यांमध्ये कडवटपणा आला असून ही प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहेत. एका रिपोर्टनुसार, दिवसाला किमान ६० टक्के अशी प्रकरणं समोर येतात ज्यामध्ये मोबाइलमुळे दांपत्यांमध्ये भांडण झालेलं असतं.
असंच एक प्रकरण समोर आलं ज्यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पतीचं म्हणणं आहे की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात वाढदिवसाची पार्टी होती. यावेळी त्याने आपल्या पत्नीसोबत अनेक फोटो काढले होते. पत्नीने काही वेळाने फेसबुकवर पार्टीतले फोटो अपलोड केले. मात्र फोटो टाकताना तिने फक्त एकटीचेच फोटो अपलोड केले. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झालं.