Breaking-newsराष्ट्रिय
पाठ्यपुस्तकांमध्ये आणीबाणीचा समावेश करणार – जावडेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/prakashjavadekar.jpg)
जयपूर – आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीवरील कलंक आहे. त्या काळ्या अध्यायाबाबतचे सत्य शालेय आणि महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात येईल. नव्या पिढीमध्ये जागृती करण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील, अशी घोषणा आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
राजस्थानमधील बंडखोर आमदार घनश्याम तिवारी यांनी सोमवारी भाजपला रामराम ठोकला. राजस्थानसह देशात मागील चार वर्षांपासून अघोषित आणीबाणी लागू असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. मात्र, तिवारी यांचा आरोप खोटा असल्याचे जावडेकर यांनी म्हटले. महागाईच्या मुद्द्यावरून त्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले. कॉंग्रेसच्या राजवटीत वाढती महागाई ही सर्वसामान्य बाब होती. मात्र, भाजपच्या कार्यकाळात ती कमी झाल्याचा दावा त्यांनी केला.