breaking-newsआंतरराष्टीय
पाकिस्तानात 11 दहशतवाद्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/fashi-630x420.jpg)
इस्लामाबाद – पाकिस्तानात 60 जणांच्या हत्येबद्दल अकरा दहशतवाद्यांना विशेष लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आज शिक्कामोर्तब करताना त्यांची शिक्षा कायम केली.
या दहशतवाद्यांवर 36 नागरीक आणि 24 सुरक्षा जवानांच्या हत्येचा आरोप आहे. त्यांच्या हल्ल्यात अन्य 142 जण जखमी झाले आहेत. या दहशतवाद्यांवर पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांवर तसेच मलकंद विद्यापीठावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
खैबर पख्तुनवा प्रांताचे विधानसभेचे सदस्य इम्रान खान मोहमिंद यांच्याही हत्येचा त्यांच्यावर आरोप आहे. या दहशतवाद्यांनी आपल्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे ट्रायल कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.