breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तानला हादरवणारं विमान लडाखमध्ये तैनात

श्रीनगर : भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंग भदोरिया यांनी लेह आणि श्रीनगर येथील वायू दल तळांना भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल हाय अलर्टवर आहे.

चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यासोबतच्या सुरक्षा बैठकीनंतर भदोरिया यांनी त्यांचा लेह आणि श्रीनगर दौरा सुरू केला. हवाई दलाचे शक्तीशाली लढाऊ विमाने लडाख आणि परिसरात तैनात आहेत.

हवाई दल प्रमुख लेह आणि श्रीनगरला दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. बुधवारी या दौऱ्याची सुरुवात झाली. चीन सीमेवरील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी या दोन तळांवर आघाडीचे लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती वरिष्ठ सरकारी सूत्रांनी एका वाहिनीला दिली. चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली होती.

या तणावानंतर भारतीय सैन्य आणि हवाई दल हाय अलर्टवर आहे. दररम्यान, हवाई दलाने बालाकोट एअर स्ट्राईकसाठी वापरलेलं आघाडीचं लढाऊ विमान मिराग २००० लडाखजवळील तळावर तैनात केलं आहे, जिथून पँगोंग त्सो आणि इतर ठिकाणी काही मिनिटात उड्डाण घेता येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button