breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानला पाणबुड्यांचे तंत्रज्ञान देण्यास जर्मन संरक्षण समितीचा स्पष्ट नकार

बर्लिन – भारत राफेल विमानांसहित शस्त्रसज्ज होत असताना पाकिस्तानने पाणबुड्यांसाठी आवश्यक असलेल्या एयर इंडिपेंडंट प्रोप्लेशन (AIP) सिस्टीमचा पुरवठा करण्याची विनंती जर्मनीला केली होती. मात्र जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या अध्यक्षतेखालील जर्मनीच्या संरक्षण समितीने पाकिस्तानची ही मागणी धुडकावून लावली आहे. पाणबुडीला अनेक दिवस समुद्रात राहण्यासाठी एअर इंडिपेंडंट प्रोप्लेशन या सिस्टीमची गरज असते.

पाणबुडीचे बॅटरी या एअर इंडिपेंडंट प्रोप्लेशन सिस्टिममुळे रिचार्ज करता येते. त्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर पाणबुडीला येण्याची गरज भासत नाही. पाणबुडी या सिस्टिममुळे दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकते. त्यामुळेच पाकिस्तानने या इंडिपेंडंट प्रोप्लेशन सिस्टिमची मागणी जर्मनीकडे केली होती. मात्र जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या अध्यक्षतेखालील फेडरल सेक्युरिटी कौन्सिलने जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासाला हे तंत्रज्ञान आपण पाकिस्तानला देणार नाही, असे सांगितले आहे.

पाकिस्तानच्या पाणबुड्यांची ताकद वाढविण्यासाठी पाकिस्तानला अद्ययावत तंत्रज्ञानांनी त्या सुसज्ज करावयाच्या आहेत. चीन-पाकिस्तान संयुक्त प्रकल्पाअंतर्गत युनान क्लास पाणबुड्यांची निर्मिती चीनमध्ये करण्यात आली आहे. मात्र पारंपरिक पाणबुडीला दर दुसऱ्या दिवशी समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. त्यामुळे शत्रुराष्ट्राच्या रडारला त्या पाणबुडीचे लोकेशन समजू शकते. म्हणूनच अनेक दिवस समुद्रात राहण्याचे हे एअर इंडिपेंडेंट प्रोप्लेशन तंत्रज्ञान पाकिस्तानला हवे आहे. मात्र जर्मनीने त्यास साफ नकार दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button