पाकिस्तानने केला परवेझ मुशर्रफ यांचा पासपोर्ट ब्लॉक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/mushraff-330x185.jpg)
इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने गृह मंत्रालयाला माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा पासपोर्ट ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. विशेष न्यायालायने दिलेल्या आदेशानंतर पाकिस्तान सरकारने ही कारवाई केली आहे. देशद्रोह प्रकरणात न्यायालयात हजर न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल डेटा बेस आणि रजिस्ट्रेशन अथॉरिटी आणि इमिग्रेशन अॅण्ड पासपोर्ट डायरेक्टरेटला ही कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या कारवाईमुळे परवेझ मुशर्रफ परदेशात प्रवास करु शकणार नाहीयेत. तसंच त्यांच्या बँकिंग व्यवहारावरही बंधनं येणार आहेत.
२००७ मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये आणीबाणी लागू केली होती. यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू करण्यात आला आहे. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे.