पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांना एनएबीचे समन्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/imran-khan-.jpg)
पेशावर – पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरोने सरकारी हेलिकॉप्टरचा दुरूपयोग केल्याच्या प्रकरणात समन्स जारी केले आहे. त्यांनी खैबर पख्तुनवा प्रांतातील सरकारचे हेलिकॉप्टर व्यक्तीगत कारणासाठी वापरून सरकारी तिजोरीचे 20 लाख 17 हजार रूपयांचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या प्रांतात सन 2013 पासून इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ पक्षाचे सरकार सत्तेवर आहे.
इम्रान खान यांना याच प्रकरणात या आधी जुलै 18 रोजी एनएबीने समन्स जारी केले होते पण त्यावेळी निवडणुकीचे कारण देऊन त्यांनी या प्रकरणात हजेरी देण्याचे टाळले होते. त्यामुळे त्यांना आता 7 ऑगस्ट रोजी पुन्हा एनएबी समोर हजर राहावे लागणार आहे. इम्रानखान हे येत्या 11 ऑगस्ट रोजी त्या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.