Breaking-newsआंतरराष्ट्रीय
पाकमध्ये सरकारकडून मंदिरासाठी 2 कोटींचा निधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/krishnatemple-.jpg)
इस्लामाबाद : रावळपिंडी येथील कृष्ण मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. ही रक्कम मंदिराच्या दुरुस्तीसोबतच त्याच्या विस्तारीकरणावर खर्च केली जाणार आहे. हिंदूंच्या सणांवेळी अधिकाधिक भाविकांना सामावून घेण्यासाठी मंदिर परिसराचा विस्तार केला जाणार आहे.
रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये हे एकमात्र मंदिर असून येथे प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते. या मंदिराच्या जिर्णोद्धाराची मागणी हिंदू समुदायाकडून दीर्घकाळापासून होत होती. या मंदिराची उभारणी 1897 मध्ये करण्यात आली होती. 1970 पर्यंत या मंदिराचे व्यवस्थापन स्थानिक हिंदूंकडे होते. 1970 मध्ये विस्थापित ट्रस्ट प्रॉपर्टी मंडळाने या मंदिराचे व्यवस्थापन स्वतःच्या ताब्यात घेतले.