breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

पहिल्यांदाच कडेगावातील गगनचुंबी ताबूत मिरवणूक रद्द

सांगली – हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगावमधील ऐतिहासिक मोहरम यावर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताबूत मिरवणूक व भेट रद्द करत साधेपणाने पारंपरिक धार्मिक विधी साजरा करण्यात आला. दरम्यान, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व गेल्या दोन शतकापासून सुरू असलेल्या मोहरम व गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळ्याला यावर्षी कोरोनामुळे खंड पडला. त्यामुळे इतिहासात प्रथमच येथील सुरेशबाबा देशमुख चौक-मोहरम मैदान पूर्णपणे सुने सुने पडले होते. यावेळी कोरोनाचे संकट दूर कर, अशी प्रार्थना अल्लाह आणि पैगंबरांचे नातू हजरत इमाम हसन आणि हुसेन यांच्याकडे करण्यात आली.

कडेगाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत संपूर्ण देशात व राज्यात प्रसिद्ध आहे. येथील मोहरमची परंपरा वेगळी आहे. या ठिकाणी मोहरमनिमित्त १४ ताबूत बसवले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात. मोहरमनिमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. परंतु चालू वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने सर्वच धार्मिक सण आदी कार्यक्रम रद्द केले होते. त्यामुळे चालू वर्षी मोहरम सणही पारंपरिक पद्धतीने व धार्मिक विधीने साधेपणाने ताबूतांची उंची कमी करून साजरा करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button