Breaking-newsआंतरराष्ट्रीय
पश्चिम बंगाल, बांगलादेशला चक्रीवादळाचा धोका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/cyclone-kyar.jpg)
बुलबुल चक्रीवादळ शनिवारी रात्री पश्चिम बंगालमधील सागर बेटे आणि बांगलादेशातील खेपुपारा यामध्ये धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर ते बांगलादेशातील सुंदरबन या त्रिभूज प्रदेशाकडे सरकणार असल्याचा अंदाज कोलकातामधील हवामान खात्याने वर्तविला आहे.
चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग ११० ते १२० कि.मी. प्रतितास असेल आणि त्यासोबत ताशी १३५ कि.मी. वेगाचे वारेही वाहतील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी सायंकाळी पश्चिम आणि पूर्व मिदनापोर, दक्षिण आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० कि.मी. इतका होता तो ताशी ११० ते १२० इतका वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.