परवेझ मुशर्रफ यांचे पाकचे नागरिकत्व रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/musharraf-1.jpg)
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे पाकिस्तानी नारीकत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांचे परपत्र, राष्ट्रीय ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे रद्द करण्यात आली असून तशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. सध्या ते दुबईमध्ये रहात आहेत.
आणखी काही महिन्यांमध्ये पाकिस्तात संसदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मुशर्रफ यांनी ती लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि, त्यांना प्रतिबंध करण्यात आला होता. यासंबंधीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. तथापि, पाकिस्तानच्या प्रशासनाते अचानकपणे निर्णय घेत त्यांचे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घोषित केला. याविरोधात ते न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या या आदेशावर पाकचे काळजीवाहू पंतप्रधान नझीर उल मुल्क यांची स्वाक्षरी आहे. या आदेशामुळे मुशर्रफ यांचे दुबईतील वास्तव्यही संकटात सापडले आहे. दुबई सरकार त्यांना केव्हाही देशाबाहेर घालवू शकते. त्या सरकारने तसे केल्यास मुशर्रफ कोठे जातील हा प्रश्न असून त्यांचे कुटुंबिय काळजीत आहेत, असे सांगण्यात आले.
मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. त्यांनी न्यायालयासमोर उपस्थित रहावे असा आदेश काढण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकदा त्यांनी उपस्थिती टाळली आहे. आता त्यांना न्यायालयासमोर उपस्थित व्हायचे असेल तर त्यांच्यासाठी पाक सरकारला विशेष कागदपत्रांची सोय करावी लागणार आहे.