Breaking-news
पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी -राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rahul-gandhi-karnatak-4.jpeg)
नवी दिल्ली : बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेबाहेर काँग्रेस व जेडीएसने आनंद साजरा केला. ”आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे”, असे म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले आहेत.
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर हल्लाबोल चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत. मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी उघडपणाने कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला.