breaking-newsआंतरराष्टीय

पंजाब नॅशनल बँक: घोटाळ्यात बँकेचाच हात; नीरव मोदीला दिली २५ हजार कोटींची बेकायदा हमीपत्रे

महाईन्यूज |

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला खुद्द पीएनबी बँकेनेच बेकायदा पद्धतीने मदत केल्याचे समोर आले आहे. न्याय वैद्यक पडताळणीमध्ये हा खळबळजनक खुलासा झाला आहे. यातून या प्रकरणातील भ्रष्टाचाराची मूळ किती खोलवर पसरली आहेत हे समोर आले आहे.पीएनबीने या घोटाळ्याची तक्रार केंद्रीय तपास पथकाकडे (सीबीआय) केल्यानंतर २०१८ मध्ये बेल्जिअमच्या ऑडिटर बीडीओकडे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची जबाबदारी बँकेकडूनच सोपवण्यात आली होती. त्यानंतर ऑडिटरने २०१८ पर्यंत देण्यात आलेल्या माहितीची पडताळणी केली. यामध्ये त्यांना आढळले की, पीएनबीकडूनच एकूण २८,००० कोटी रुपयांचे मूल्य असलेली १५६१ लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) अर्थात हमीपत्रे नीरव मोदी ग्रुपला देण्यात आली होती. यांपैकी २५ हजार कोटींची १३८१ हमीपत्रे ही बेकायदा पद्धतीने देण्यात आल्याचे समोर आले आहे.

चौकशीमध्ये हे देखील उघड झाले आहे की, ज्या २३ निर्यातदारांच्या नावे ही हमीपत्रे काढण्यात आली होती. त्यांपैकी २१ जणांवर नीरव मोदीचे नियंत्रण होते. त्यानंतर बँकेला पैसे देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या १९३ हमीपत्रांचा गैरवापर केला गेला. ऑडिटरने या चौकशीशी संबंधीत ५ हंगामी आणि एक अंतिम अहवाल बँकेला सोपवला आहे.बीडीओचा हा ३२९ पानांचा न्यायवैद्यक अहवाल एका जागल्याने इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टकडे (आयसीआयजे) सोपवला होता. आयसीआयजे आणि द इंडियन एक्स्र्पेसमधील करारानुसार, न्यायवैद्यकच्या टीमचे अनेक निष्कर्ष अहवालांच्या माध्यमातून समोर आणले जाणार आहेत. नीरव मोदीचा घोटाळा किती मोठा होता याचे आकलन करण्याबाबत बीडीओचा न्यायवैद्यक अहवाल हा केंद्रीय तपास पथके सीबीआय आणि ईडीपेक्षा देखील वेगवान तपास करणारा ठरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button