breaking-newsराष्ट्रिय

न्यू फरक्का एक्स्प्रेस रूळांवरून घसरली, ७ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना घडली आहे. रायबरेलीवरून दिल्लीला जाणाऱ्या न्यू फरक्का एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले असून यात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जणाचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये २७ जण गंभीर जखमी आहेत. हरचंदपुर स्टेशनपासून ५० मीटर अंतरावर हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यामध्ये एका महिलेचा आणि लहान मुलीचा समावेश आहे. रूळाला तडे गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. आपघातानंतर घटनास्थळावर भितीचे वातारण निर्माण झाले होते. प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनास्थळावर एनडीआरएफचं पथक पोहोचलं असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरफ पथकासह स्थानिक पोलिस आणि रूग्णवाहिका घटनास्थळावर दाखल झाली आहे. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी रेल्वेचे उपव्यवस्थापक, पोलीस महासंचालक, आरोग्यविभाग, आणि एनडीआरएफला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

 

ANI UP

@ANINewsUP

6 died at the site of incident&27 injured taken to hospital. 1 declared dead at the hospital. There is no live victim trapped now: Sanjeev Kumar, Team Commander NDRF, on New Farakka Express Train derailment near Harchandpur railway station this morning.

 

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे. पाटणा हेल्पलाइन नंबरः ०६१२-२२०२२९०, २२०२२९१, २२०२२९२

ANI

@ANI

New Farakka Express train derailment in : Railway Minister Piyush Goyal has announces Rs 5 lakh ex-gratia for the next of the kin of the deceased, Rs 1 lakh compensation for those with serious injuries and Rs 50,000 for those with minor injuries. (file pic)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button