breaking-newsराष्ट्रिय

नीरव, चोक्‍सीच्या विरोधातील रेड कॉर्नर नोटिसांसाठी प्रयत्न

नवी दिल्ली – पीएनबी घोटाळा करणारे हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिसा जारी कराव्यात यासाठी सीबीआयने प्रयत्न सुरू केले आहेत. नीरव ब्रिटनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चोक्‍सी अमेरिकेत असल्याचा संशय आहे.

नीरव आणि चोक्‍सी विविध कारणे पुढे करून घोटाळ्याच्या तपासात सहकार्य करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सीबीआयने आता इंटरपोलला साकडे घातले आहे. इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिसा जारी केल्यास त्या संस्थेचे सदस्य नीरव आणि चोक्‍सीला अटक करून भारतात प्रत्यार्पित करू शकतात. नीरव आणि चोक्‍सीने पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचा गंडा घातला. हा घोटाळा उघड होण्यापूर्वीच त्यांनी देशाबाहेर पलायन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button