Breaking-newsराष्ट्रिय
निवडणूक आयोगावर पंतप्रधानांचा दबाव : सुरजेवाला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/modi-EC.jpg)
कोलकाता- काँगेसचे जेष्ठ नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट दबाव असल्याचा गंभीर आरोप केला. याचबरोबर भाजपा आयटी सेल प्रमुखांनी निवडणूक आयोगाच्या आधीच निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्याचा पुरावा देत त्यांनी भाजपा हाच ‘निवडणूक आयोगाची’ भूमिका बजावत असल्याचे देखील म्हंटले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की आज निवडणूक आयोगाद्वारे पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मात्र काही कारणास्तव ही पत्रकार परिषद निवोजीत वेळेवर होऊ शकली नाही.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची अचानक बदलेली वेळ आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून काँग्रेसचे जेष्ठ नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याप्रकरणावर आक्षेप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळेच सदर पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
ट्विटर द्वारे आपली भूमिका मांडताना सुरजेवाल यांनी म्हंटले आहे आहे की “निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद १२.३० ला होणार होती, तसेच पंतप्रधानांची सभा आज अजमेर येथे १ वाजता होती त्यामुळेच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचा वेळ अचानक बदलून दुपारी ३ वाजताची केली.