Breaking-newsराष्ट्रिय
‘निपाह’चा संसर्ग रोखण्यासाठी जपान, ऑस्ट्रेलियाहून मागवली औषधे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/nipah-.jpg)
कोझिकोड : केरळमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या निपाह व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याने जपान आणि ऑस्ट्रेलियामधून औषधे मागवण्याचा निर्णय घेतला आहे. एनआयव्ही व्हायरसला अटकाव करणाऱ्या या औषधाच्या ऑस्ट्रेलियात घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.
केरळच्या कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हयुमन मोनोक्लोनल अँटीबॉडी एम १०२.४ हे औषध ऑस्ट्रेलियाहून मागवण्यात आले असून ते आज रात्रीपर्यंत कोझिकोडमध्ये पोहोचेल. या औषधाचे ५०० डोस मागवण्यात आले आहेत.