breaking-newsराष्ट्रिय
नवी दिल्लीत मेट्रो सुरू करण्याची केजरीवालांची केंद्राकडे विनंती
नवी दिल्ली – देशभरात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत असली तरी काही राज्यांनी यावर नियंत्रण मिळवले आहे. नवी दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात आली आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे येथील अनेक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे विनंती केली आहे की, दिल्ली मेट्रो ट्रायल बेसिसवर फेजनुसार सुरू करण्याची परवानगी दिली जावी. लवकरच केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात इंडस्ट्री असोसिएशनसह त्यांनी बैठक घेतली होती. तेथे त्यांना अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या, ज्यावर ते काम करीत आहेत. ते म्हणाले की येत्या दिवसात इंडस्ट्रीच्या भागातील काही मोठ्या घोषणा करण्यात येणार आहेत.