breaking-newsराष्ट्रिय

नवऱ्याने दुसऱ्या बायकोच्या मदतीने पहिलीला संपवलं नंतर दुसरीचीही हत्या

दोन विवाह करणाऱ्या मोहम्मद जमशेद आलमला दोन्ही बायकांकडून घटस्फोट हवा होता. पण त्याला दोघींनी नकार दिल्यानंतर त्याने पद्धतशीर कट रचून दोघींची हत्या केली व नंतर मुलाला घेऊन पळून गेला. दिल्लीच्या जैतपूर भागात मागच्या आठवडयात ही धक्कादायक घटना घडली. २००० साली मोहम्मद जमेशद आलमचे इस्मत परवीन बरोबर लग्न झाले. त्यावेळी तो फक्त १८ वर्षांचा होता.

लग्नाच्या सहावर्षानंतर या जोडप्याला मुलगा झाला. हे कुटुंब आनंदात राहत होते. २००९ साली मोहम्मद आलमला झाबीना नावाची एक मुलगी आवडू लागली. तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर परवीनच्या सुखी संसारात वादळ आले. परवीनच्या त्याच्या प्रेमाला विरोध होता. पण अखेर तिने माघार घेतली. आलमने झाबीनाबरोबर दुसरे लग्न केले व तिला बिहारमधील आरारिया जिल्ह्यातील आपल्या घरी घेऊन आला.

पुढची काही वर्ष दोन्ही बायका एकत्र एकाच घरात राहत होत्या. २०१६ साली आलमने जीवनमान उंचावण्यासाठी दिल्लीला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या जैतपूर भागात या कुटुंबाने भाडयावर घर घेतले. दिल्लीत आल्यानंतर आलमच्या आयुष्यात अपेक्षेनुसार काही घडत नव्हते. त्याच्या दोन बायकांमध्ये सतत पैशावरुन भांडण सुरु होती. आलमच्या दोन्ही बायका त्याला सतत टोमणे मारायच्या. पैशांवरुन त्याच्याबरोबर भांडण करायच्या.

या त्यांच्या रोजच्या त्रासाला कंटाळून त्याने दोघीकंडे घटस्फोट मागितला. पण दोघींनी त्याला नकार दिला. अखेर आयुष्य शांततेत जगण्यासाठी आलमने दोघींना संपवण्याचा निर्णय घेतला. पेपरमधील गुन्हेगारीच्या बातम्या, ऑनलाइन क्राइम व्हिडिओ पाहून त्याने प्लान बनवला.

एका पत्नीची हत्या करण्यासाठी दुसरीला राजी करायचे नंतर दुसरीची सुद्धा हत्या करायची असा त्याचा प्लान होता. त्याने झाबीनाला विश्वासात घेतले. परवीनचा अडथळा मार्गातून दूर होणार असल्यामुळे ती सुद्धा तयार झाली. २६ जूनच्या रात्री जेवण झाल्यानंतर तिघांमध्ये भांडण सुरु झाले. ओढणीच्या मदतीने त्याने परवीनचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने झाबीनाची सुद्धा गळा आवळून हत्या केली. मुलाला घेऊन तो घरातून पळून गेला. एक जुलैला पोलिसांनी त्याला अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button