धडाकेबाज ऑफर; स्मार्टफोन खरेदीवर मिळतोय 1 किलो कांदा अगदी मोफत!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ONION-MOBILE-Frame-copy-2.jpg)
महाईन्यूज |
सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. देशातील अनेक राज्यात कांदा 100 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. यातच तामिळनाडू येथील एका दुकानदाराने स्मार्टफोन विक्रीसाठी अनोखी ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांनी स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यांना एक किलो कांदाही मोफत मिळणारच आहे.तामिळनाडू येथील पट्टुकोट्टईमधील एसटीआर मोबाईल दुकानात ही ऑफर आहे.
ग्राहकांनी दुकानातून स्मार्टफोन खरेदी केला, तर त्यांना एक किलो कांदा मोफत दिला जाईल. ग्राहकांना फायदा व्हावा, या उद्देशाने आम्ही ही ऑफर आणली आहे, असे या दुकानाचे मालक सतीश यांनी सांगितले आहे. आणी ही ऑफर सुरु केल्यानंतरच ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सतिश यांनी सांगितले. तर दुसरीकडे, स्मार्टफोन आणि कांदा दोघांचीही गरज होती. त्यामुळे या ऑफरच्या माध्यमातून स्मार्टफोन आणि कांदा खरेदी केल्याचे एका ग्राहकाने माध्यामाशी बोलताना सांगितले.