breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक ! वडिलांच्या मृतदेहावर पोलीस अधिकाऱ्याकडून आयुर्वेदिक उपचार

मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली असून वडिलांच्या मृत्यूनंतरही पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता आयुर्वेदिक उपचार सुरु ठेवले होते. विशेष म्हणजे वडील आयुर्वेदिक उपचाराला साथ देत होते असा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या 84 वर्षीय वडिलांचा 14 जानेवारीला भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता.

अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र कुमार मिश्रा यांच्या वडिलांचा फुफ्फुसाच्या विकारामुळे महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला होता. मिश्रा यांच्या स्टाफने मृतदेह कुजण्यास सुरु झाल्यानंतर तक्रार केली असता हे प्रकरण उघडकीस आलं. मात्र याप्रकरणी कोणतीही तक्रार नसल्याने नेमकी काय कारवाई करावी असा प्रश्न पोलिसांना पडला होता.

राजेंद्र कुमार मिश्रा यांना यासंबधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘हे खासगी प्रकरण आहे. मला माहित नाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं आहे पण जेव्हा त्यांनी हात वर केले तेव्हा आम्ही वडिलांना घरी आणलं. आयुर्वेदिक डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत’. पण जेव्हा इतर शेजाऱ्यांना विचारण्यात आलं तेव्हा कोणीही त्यांच्या वडिलांना महिन्याभरापासून पाहिलं नसल्याचं सांगितलं.

फॉरेन्सिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘पाहणी केली असता मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. वडिलांनी समाधी घेतली असावी ही त्यांच्या कुटुंबाची श्रद्धा होती. पण मृतदेह कुजण्यास सुरुवात झालेली नव्हती. मृतदेहाची सध्या काय परिस्थिती आहे यावर काही बोलू शकत नाही’.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button