breaking-news
धक्कादायक! बीएसएफच्या सहायक कमांडंटची आत्महत्या
![माऊंट त्रिशूल मोहिमेतील चार नौदल कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/death-Frame-copy-3.jpg)
काश्मीर | महाईन्यूज
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील करोले कृष्णा चौकीवर बीएसएफच्या एका सहायक कमांडंटने आत्महत्या केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. बी बी यादव असं त्यांचं नाव आहे.
आज सकाळी ही घटना घडली असुन, यादव यांचा मृतदेह हिरानगर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये.