देशात २४ तासांत ६४,५३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
नवी दिल्ली – भारतात गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मंगळवारी दिवसभरात देशात तब्बल ६४ हजार ५३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १ हजार ९२ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २७ लाख ६७ हजार २७४ वर पोहोचली आहे. दरम्यान, भारतात चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. मंगळवारी देशात ८ लाख १ हजार ५१८ जणांची चाचणी करण्यात आली. तर मंगळवारपर्यंत एकूण ३ कोटी १७ लाख ४२ हजार ७८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे भारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी २० लाख ३७ हजार ८७१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा ५२ हजार ८८९ वर पोहोचला आहे. तसेच सध्या ६ लाख ७६ हजार २७४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.