breaking-newsराष्ट्रिय

देशात मागील २४ तासांत ६९ हजार ९२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  • देशात मागील २४ तासांत ६९ हजार ९२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – भारतात मागील काही दिवस दररोज ७० हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत होती. त्यात आज काहीशी घसरण झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. देशात मागील २४ तासांत ६९ हजार ९२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ८१९ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३६ लाख ९१ हजार १६७ वर पोहोचली आहे. यापैकी ६५ हजार २८८ जणांनी आपला जीव गमावला असून २८ लाख ३९ हजार ८८३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर देशात सध्या ७ लाख ८५ हजार ९९६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, एकीकडे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात असताना दुसरीकडे देशात आजपासून ‘अनलॉक ४’ला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात केंद्र सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून बार पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच ७ सप्टेंबरपासून मेट्रो ट्रेन सेवाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था व शिकवणी केंद्र मात्र ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button