दिल्ली विमानतळावर शर्यतीदरम्यान दोन बस एकमेकांना धडकल्या
![# Covid-19: Negligence reigns in Delhi! The cowardly report of the passengers from Maharashtra has not been checked](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/dilli-airport-international.jpg)
नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअरलाइन्सच्या दोन बसमधे शर्यत झाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या बसमध्ये टर्मिनल -2 कडे जाण्यासाठी प्रवासी बसलेले होते. दोन्ही बसचा अपघात झाला. या घटनेत दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत.
शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना टर्मिनल -2 वर घडली. उदयपूर आणि अन्य शहरातून आलेल्या विमानातील प्रवाशांना घेऊन या बस टर्मिनल -2 कडे जात होत्या. त्याचवेळी बसच्या चालकांनी एकमेकांसोबत शर्यत लावली. त्यावेळी प्रवाशांनी बसचालकांनी विरोध देखील केला.
मात्र त्यांना न जुमानता त्या बसचालकांनी रेस सुरूच ठेवली आणि अखेर शर्यतीदरम्यान दोन्ही बस एकमेकांना धडकल्या. यात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आयजीआय विमानतळ पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
सुरूवातीला याप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी बसप्रवाश्यांनी नकार दिला. त्यानंतर काही प्रवाश्यांनी पुढाकार घेऊन बस चालकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. बसचालकाच नशेत असताना बस चालवत असल्याचा आरोप बसप्रवाशांनी केला आहे.