दिल्ली मधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द : मनीष सिसोदिया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/manoj-sasodiya.jpg)
- लवकरचं पदवी प्रमाणपत्र मिळणार
नवी दिल्ली : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आता दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने देखली विद्यापीठातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्व विद्यापीठातील परीक्षा रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरमध्ये पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्व विद्यापीठांना शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे परीक्षा न घेणे आणि पदवी प्रमाणपत्र न देणे अन्याय होईल. हा निर्णय राज्यातील सर्व विद्यापीठांना लागू आहे.
दिल्ली मधील सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षांबाबत केंद्राने निर्णय घ्यावा, असेही सिसोदिया म्हणाले. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून देशातील केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षांबाबतही असाच निर्णय घ्यावा, असे निवेदन दिले आहे.