दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/farmers.jpg)
कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी देशातील हजारो शेतकरी आज (शुक्रवारी) दिल्लीत पोहोचले असून रामलीला मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा संसदेवर धडकणार आहे. या मोर्चात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घ्यावा आणि देशभरातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी कायदा मंजूर करावा, अशा दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत पोहोचले आहेत. गुरुवारी शेतकऱ्यांचा मोर्चा रामलीला मैदानात पोहोचला होता. शेतकऱ्यांचा मोर्चा रामलीला मैदानातच थांबवण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न सुरु होते. यासाठी दिल्ली पोलीस आणि मोर्चाचे आयोजन करणारे नेते यांच्यात चर्चा देखील झाली. मात्र, शेतकरी नेते संसदेवर मोर्चा नेण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि अखेर शेतकऱ्यांचा मोर्चा संसदेच्या दिशेने रवाना झाला.