breaking-newsराष्ट्रिय
दिल्लीतील विमानसेवा विस्कळीत
![#Covid-19: आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील, DGCAचा निर्णय](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/airport-.jpg)
नवी दिल्ली : धुळीच्या वादळामुळे उत्तर भारतातील देशांतर्गत विमानसेवा आज विस्कळीत झाली. दिल्लीवरून गोवाहटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला खराब हवामानामुळे 5 तास उशीर झाला. त्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. संतप्त प्रवासी विमानातून उतरून रस्त्यावर आले आणि त्यांनी टॅक्सी मार्ग अडवून धरला.
या धुळीच्या वादळामुळे इंदिरा गांधी विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या 21 विमानांचे मार्ग बदलावे लागले. या संदर्भात प्रवाशांना कोणतेही कारण सांगितले गेले नाही, अशी अनेक प्रवाशांची तक्रार होती. मात्र इंडिगो कंपनीने हे आरोप फेटाळले आहेत. गोवाहटीच्या विमानातून उतरून टॅक्सीमार्गावर आलेल्या प्रवाशांना “सीआयएसएफ’च्या जवानांनी रोखण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला.