breaking-newsराष्ट्रिय
दिल्लीतील घरात पाच जणांचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ
नवी दिल्ली | महाईन्यूज
नवी दिल्लीमधील भजनपुरा परिसरात असलेल्या एका घरात पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भजनपुरा परिसरातील राहत्या घरात पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांमध्ये तीन मुलांसह एक महिला आणि पुरूषाचा समावेश आहे. या मृतदेहांची ओळख पटली असून ते एकाच कुटुंबातील आहेत. यातील पुरूष हा रिक्षा चालक होता, असे सांगण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी पाहता हे आत्महत्येच प्रकरण असल्याचे दिसत आहे. मात्र, घरात चोरी सुद्धा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजणार आहे.