breaking-newsआंतरराष्टीय

दाऊदला भारताकडे सोपवा!

दहशतवादविरोधी लढय़ातील गांभीर्य जगाला दाखविण्याचे भारताचे पाकला आवाहन

पाकिस्तान दहशतवादाचा मुकाबला करण्याबाबत खरेच गंभीर असेल, तर त्याने भारतात दहशतवादाची बीजे पेरणाऱ्या दाऊद इब्राहिम आणि सलाहुद्दीनसह इतर अनेक कुख्यात गुन्हेगारांना भारतास सोपवावे, अशी मागणी शनिवारी भारताकडून करण्यात आली.

१९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकांसह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असलेले दाऊद आणि सलाउद्दीन गेली अनेक वर्षे पाकिस्तानात वास्तव्यास आहेत. त्यांना भारताकडे सोपविल्यास दहशतवादाविरोधात पाकिस्तान खरेच गंभीर असल्याचा संदेश जगाला जाईल, असे मत सरकारी सूत्रांनी शनिवारी व्यक्त केले.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतरही जैश-ए-महम्मद आणि इतर दहशतवादी गटांविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. या पाश्र्वभूमीवर भारताकडून शनिवारी पाकिस्तानकडे दाऊदला सोपविण्याचे आवाहन करण्यात आले.

काही दहशतवाद्यांना प्रतिबंधक स्थानबद्धतेत ठेवण्यासारख्या पाकिस्तानच्या कृती या केवळ दिखावा आहे, असे भारत मानतो आणि दिखाव्याने काही होणार नाही. अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या संबंधात भारतात हवा असलेला दाऊद व सलाहुद्दीनसह इतर अनेक दहशतवाद्यांना आपल्या ताब्यात द्यावे, असे भारताने याहीआधी पाकिस्तानला सांगितले आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांच्या सूत्रधारांचे तपशील भारताने पाकिस्तानला दिले असून, एखादा तिसरा देश ते पडताळून पाहू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

आक्रमक पवित्रा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाच्या मुद्दय़ावर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करण्यासाठी राजनैतिक मार्गाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानी भूमीवरून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांवर पाकिस्तानने ठोस आणि सिद्ध होईल अशी कारवाई करावी, अशी मागणी भारत करत आहे.

पाकचा केवळ दिखावा..

काही दहशतवाद्यांना प्रतिबंधक स्थानबद्धतेत ठेवण्यासारख्या पाकिस्तानच्या कृती या केवळ दिखावा आहे, असे भारत मानतो अन् त्याने काही होणार नाही. प्रत्यक्षात दाऊदला सोपविले, तर पाकिस्तानचे दहशतवादविरोधी लढय़ातील गांभीर्य समजू शकेल, असे भारतीय सरकारी सूत्रांनी शनिवारी जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button