breaking-newsराष्ट्रिय
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांशी मोदींची चर्चा
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांच्याशी द्विपक्षीय बाबींवर चर्चा केली. मून हे पहिल्याच भारत भेटीवर रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांचे आज राष्ट्रपती भवनात औपचारीक स्वागत करण्यात आले. काल मोदी व मून यांच्या हस्ते नोयडा येथे सर्वात मोठ्या मोबाईल फोन फॅक्टरीचे उद्घाटन झाले होते. त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल एका पारंपारीक संगीत कार्यक्रमाचेही आयोजन केले होते.
तसेच काल कोरियन अध्यक्षांनी भारतात राहणाऱ्या कोरियन नागरीकांशी संवाद साधला. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सहकार्य क्षेत्र वाढवण्याच्या संबंधात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती. आज मोदींबरोबर झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमधील व्यापार आणि संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.